प्रस्तावना
महाराष्ट्र शासनाने सन 1992 मध्ये राज्यातील 250 हेक्टर पर्यंतच्या सिंचन क्षमता असलेल्या लघु पाटबंधारे प्रकल्पांचे बांधकाम व बांधकाम पूर्ण झालेल्या लघु प्रकल्पांच्या देखभाल व व्यवस्थापनाचे काम ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडे सोपविले आहे. दि. 31/05/2017 रोजीचे शासन निर्णयानुसार विभागाची पुर्नरचना करण्यात आले असुन मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. विभागाकडील योजनांचे कार्यक्षेत्र 250 हे. ऐवजी 600 हे. पर्यंत वाढविण्यात आले आहे.
मृद व जलसंधारण विभागामार्फत ज्या योजनांची कामे हाती घेण्यात येतील त्यासंबंधी तांत्रिक मार्गदर्शन व प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक महसूल विभागात एक असे सहा मंडळ कार्यालये निर्माण करण्यात आली. सदर सहा मंडळ कार्यालयांना तांत्रिक मार्गदर्शन देण्यासाठी व त्यांच्यावर प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी अप्पर आयुक्त्ा जलसंधारण तथा मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण विभाग, पुणे व नागपुर या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असुन मृद व जलसंधारण आयुक्तालय औरंगाबाद येथे स्थापन करण्यात आले आहे.
जलसंधारण अंतर्गत खालील कामे घेण्यात येतात.
- शासन निधीतून 0 ते 600 हेक्टर पर्यंतच्या लघु पाटबंधारे योजना
- महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या निधीतून 0 ते 600 हेक्टर पर्यंतच्या लघु पाटबंधारे योजना
- लघु पाटबंधारे प्रकल्पांची प्रगणना
- जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत साखळी सिमेंट नाला बंधा-याची कामे
- माजी मालगुजारी तलावाची कामे
महाराष्ट्र राज्यात 0 ते 600 हेक्टर पर्यंतचे पाटबंधारे प्रकल्प, सामाजिक वनीकरण यांसह पाणलोट व जलसंधारण कामांचे प्रचालन, प्रवर्तन आणि शीघ्र विकास आणि नियमन करण्यासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाची ऑगष्ट 2000 मध्ये स्थापना करण्यात आली. राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या धोरणांशी अनुरुप या कामांसाठी योजना तयार करणे, त्यांचे प्रचालन करणे, त्या कार्यान्वित करणे, त्यासाठी वित्तपुरवठा करणे ही महामंडळाची कार्ये आहेत.
सध्या महाराष्ट्र जलसंधारण महामंडळामार्फत राज्यातील अनुशेष जिल्हयातील योजनांना प्रधान्याने निधी देण्यात येतो. या कार्यालयामार्फत ज्या योजनांना शासन व महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ यांचेकडून निधी प्राप्त होतो त्या योजना तयार करणे, त्यांचे प्रचालन करणे, त्या कार्यान्वित करणे ही कामे करण्यात येतात.
माहितीचाअधिकारअधिनियम २००५
अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता ,पुणे-6 या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अखत्यारीतील
अपिलीय अधिकारी,माहिती अधिकारी व सहाय्यक माहिती अधिकारी यांची तपशीलवार माहिती
अपिलीय अधिकारी |
|||||
अ.क्र. |
अपिलीय प्राधिकारी यांचे नाव |
अधिकारी पद |
अपिलीय प्राधिकारी म्हणुन त्यांची कार्यकक्षा |
अहवाल देणारे माहिती अधिकारी |
ई-मेल पत्ता( या कार्यालया पुरताच) |
१ |
सु. पां. कुशिरे
|
अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता |
परिक्षेत्र पुणे कार्यालय |
श्री. कविजित सुरेश पाटील
|
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
|
माहिती अधिकारी |
||||||
अ.क्र. |
माहिती अधिकारयाचे नाव |
अधिकारी पद |
अपिलीय प्राधिकारी म्हणुन त्यांची कार्यकक्षा |
अहवाल देणारे माहिती अधिकारी |
ई-मेल पत्ता( या कार्यालया पुरताच) |
अपिलीय प्राधिकारी |
१ |
श्री. कविजित सुरेश पाटील |
सहाय्यक मुख्य |
परिक्षेत्र पुणे |
श्री. कविजित सुरेश पाटील |
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. | श्री. सु. पां. कुशिरे, अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता |
सहाय्यक माहिती अधिकारी |
||||
अ.क्र. |
सहाय्यक माहिती अधिकारयाचे नाव |
अधिकारी पद |
सहाय्यक माहिती म्हणुन त्यांची कार्यकक्षा |
संपूर्ण पत्ता/दूरध्वनी क्रमांक |
१ |
श्री. मंदार सनतकुमार जुवेकर |
उपविभागीय जलसंधारण अधिकारी |
परिक्षेत्र पुणे |
बंगला नं.१२ जेल रोड,येरवडा,पुणे-६ ,०२०/२६६८३८४६ |
महत्वाचे दुवे